मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (5 State Assembly Elections) रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर कडवी टीका केली आहे.

भाजप नेत्यांचा आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा चष्म्याचा (Glasses) नंबर वाढला आहे त्यांचे डोळे (Eyes) तपासायला लागतील अशा शब्दात संजय राऊत यांनी खोचक टोला लागावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल.

Advertisement

डॉक्टर लहाने (Doctor Lahane) यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात (BJP headquarters) पाठवता येत का हे पाहावे लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत.

त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले आहे.

गोव्यात (Goa) काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही.

Advertisement

माझे आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

उद्या तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांशी भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Advertisement