मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत त्यांनी आधीच माहिती दिली आहे. आता संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणाविरोधात (Central Investigation Agency)  डरकाळी फोडल्याचे चित्र दिसत आहे.

संजय राऊत यांनी उद्या शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद (Press Conference) घेणार असल्याचे सांगितल्यानांतर त्यांनी शिवसेना भवनात येऊन पाहणी केली आहे. तसेच सेनेच्या नेत्यांना सूचनाही दिल्या आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये संजय राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना आणि भाजप मध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.

Advertisement

संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा आणि आणि भाजप नेत्यांची पोलखोल करणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या उद्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत म्हणाले, उद्याच्या पत्रकार परिषदेकडे त्यांचे लक्ष असायलाच पाहिजे. त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी तर आवर्जुन ऐकायला हवी.

उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटते उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते. केंद्रीय तपास यंत्रणांचे जे धंदे सुरु आहेत ना ते बंद होणार उद्यापासून.

Advertisement

शिवसेना हाच महाराष्ट्र (Maharashtra) आहे. कुणीही येतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उसळेल, अन्यायाविरुद्ध लढेल, नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ.

बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी मर्दानगी शिकवली, ती उद्या दिसेल, अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला आणि भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

Advertisement