मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना 31 जुलै रोजी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Scam Case) ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. संजय राऊत यांना 8 दिवसांच्या ईडी (ED) कोठडीनंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात आलं होतं.

सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टानं संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.

गोरेगाव येथेही राऊत (Sanjay Raut) यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं सांगितलं जातं.

त्यामुळेच राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने राऊत यांना कोर्टाकडून (court) दिलासा मिळू शकला नाही, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज राऊत यांची कोठडी संपली.

त्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होत. आणि याचवेळी पुढील कारवाई वाढवली आहे.