मुंबई : स्वरकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death) यांचे काल निधन झाले. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेता शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) देखील उपस्थित होता. 

अभिनेता शाहरुख खानने लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि दुवा पढली. यावरून ट्रोलर्सनी शाहरुख खान थुंकल्याचे सांगितले आणि त्याला यावरून ट्रोल (Trolls) करण्यात आले.

यावरून शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच भडकले आहेत. ते म्हणाले की, हे कोण लोक आहेत. त्यांना थोडीही लाज नाही. अशा वेळीही हे लोक धर्म जातीचे राजकारण करत आहे.

Advertisement

ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे ते चुकीचे आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे.

एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्रोलर्सला फटकारले आहे.

नेमकं काय अंतिम संस्कारावेळी काय घडले?

Advertisement

अभिनेता शाहरुख खान यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि दुवा पद्धती. शाहरुख खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) ही देखील होती. दोघांनी सोबतच लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.

इस्लामिक परंपरेनुसार दुवा मागण्यासाठी शाहरुख खानने दोन्ही हात वर केले. त्यानंतर लतादीदींच्या पायांना स्पर्श अभिवादन केले.

दुवा पठाण करून झाल्यानंतर शाहरुख खान याने मास्क काढून परंपरेनुसार फुंकर मारली या सर्व प्रकारांनंतर त्याला ट्रोल करण्यात आले.

Advertisement