मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्राद्वारे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्राद्वारे दावे केले आहेत. यामध्ये त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा नाहीतर तुमचा लालूप्रसाद यादव करण्यात येईल अशी धमकी दिल्याचेही सांगितले आहे.

संजय राऊत यांनी ईडीकडून निकटवर्तीयांची (ED) होणारी चौकशी आणि भाजप (BJP) नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.

त्यामध्ये त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray government) पाडण्यासाठी मदत करण्याचा काही लोकांनी मला गळ घातला होता.

Advertisement

निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. परंतु मी त्याला नकार दिला आहे. तेव्हा त्यांनी मला माजी रेल्वे मंत्र्यासारखे (Railway Minister) तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली होती व माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली होती.असे खळबळजनक आरोप राऊतांनी केले आहेत.

तसेच महिन्याभरापूर्वी काही लोक मला महाराष्ट्रातले सरकार पाडण्यात मदत करा म्हणून भेटले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्या यासाठी माझा साधन म्हणून ते वापर करणार होते.

मी नकार दिला तर मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकीही मला देण्यात आली. त्याचसोबत माजी रेल्वेमंत्र्यासारखी तुमची अवस्था करुन टाकू असेही मला बोलण्यात आले होते.

Advertisement

तसेच मीच नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले दोन वरिष्ठ मंत्री आणि दोन वरिष्ठ नेते यांनाही PMLA कायदा लावून तुरुंगात धाडू.

त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील आणि सर्व महत्वाचे नेते गजाआड असतील, अशी धमकी मला देण्यात आली होती, असे राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना तीन पानी पत्राद्वारे सांगितले आहे .

Advertisement