पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जुन्या काळातील आदर्श होते. तर तर नितीन गडकरी (nitin gadkari) हे सध्याचे आदर्श आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल (Bhagatsingh Koshyari) बोलत होते.

यावेळी भाषण करताना राज्यपालांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी (nitin gadkari) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आता यावरून चांगलेच राजकारण तापले असून मनसेने देखील राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना (Bhagatsingh Koshyari) तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, अश्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी नेत्यांवर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे.

‘राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले की, ‘छत्रपतींबाबत राज्यपाल कोश्यारींनी पुन्हा एकदा दळभद्री विधान केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान करत महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे.

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलं. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली?

हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपचे सहयोगी आहेत, मुख्यमंत्री आहेत. वीर सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरले होते, जोडे मारले होते, स्वागत आहे.

आता हे जोडे कोणाला मारणार आहात? भाजपच्या प्रवक्त्यांना की राज्यपालांना? मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे,’ असं आवाहन राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.