मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut) यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगात होते. मात्र, काल त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) काल तुरुंगातून बाहेर आले आहेत. दरम्यान, राऊत तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाने एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. तसेच आता ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्याने ऑर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा मुक्तता करण्यात आली. तेव्हा शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करून मिरवणूकही काढली.

या मिरवणूकीनंतर राऊत यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Cm Eknath Shinde) अप्रत्यक्षपणे टोला लागवला. “ज्यांनी शिवसेना तोडली, फोडली,” असा उल्लेख करत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (Cm Eknath Shinde) निशाणा साधला.

“न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरविली आहे. आम्ही लढणारे आहोत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी सुटकेनंतर व्यक्त केली आहे. त्यानंतर आपल्या घरासमोर केलेल्या भाषणामध्ये राऊत यांनी, “या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल तो आपल्या शिवसेनेचा होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो आ जाऐगी सरकार,” असं म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

त्याआधी ते फोर्टीज रुग्णालयात वेगवेगळ्या तपासण्यांसाठी जाणार आहेत. संजय राऊत आज अगोदर फोर्टीज रुग्णालयात जाणार आहेत. येथे ते आरोग्य तपासण्या करणार आहेत. तसेच डॉक्टरांचा सल्लादेखील घेतील.

त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठिकाणी भेट घेण्यासाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.