मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना 31 जुलै रोजी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते. न्यायालयानं राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडी कोठडी आज संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.

राऊतांप्रमाणेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. दरम्यान संजय राऊतांच्या वकिलांकडून आज पुन्हा जामिनाची मागणी करण्यात आली.

मात्र, संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्नीच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराची चौकशी करायची असल्यानं गेल्यावेळी ईडीनं राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती.

त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत वाढ झाली असून, त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं आहे.