मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद (Press Conference) भाजपवर (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भडवा अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भडवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात १९ बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय.
ही बेनामी प्रॉपर्टी आहे असा दावा त्यांनी केला आहे. माझे आव्हान आहे त्या माणसाला, माझे त्या दलालाला आव्हान आहे.. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या १९ बंगल्यात पिकनिकला जाऊ.
जर तुम्हाला ते बंगले तिथे दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्याने मारा.. म्हणजे दिशाभूल करायची बंद करतील अशा शब्दात संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, चला जाऊ, पिकनिकला, पार्ट्या करु. खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असुया.. हाच किरीट सोमय्या यानं काही वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती.
मुंबईत मराठी भाषा शाळेत सक्तीची नको, असं म्हणाला होता. तो आज भाजपचा फ्रंटमॅन झाला आहे. हे लोक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करत आहे.
मराठी भाषेच्या विरुद्ध हा भडवा कोर्टात गेला. याचं थोबाड आधी बंद करा नाहीतर आम्ही करू, अशा कडव्या शब्दात संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे.