मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे आज चार वाजता पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) भाजपबद्दल (BJP) मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. मात्र त्यांच्या धमक्यांना भाजप पक्ष घाबरत नाही, असे थेट स्पष्टीकरण भाजपा नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिले आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, तुमच्या धमक्यांना भाजपा घाबरणार नाही. आज मुंबईत (Mumbai) ईडीचे (ED) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि अंडरवर्ल्ड संदर्भात मुंबईमध्ये धाडसत्र सुरू आहे.

त्यामधून येणाऱ्या माहितीमधून अनेक नेत्यांची झोप उडणार आहे. त्यामुळे कोणाची झोप उडेल हे चार वाजण्याआधीच संजय राऊत यांना समजणार आहे, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत हे साडेतीन नावाचा काही चित्रपट काढणार आहेत का, असा चिमटाही त्यांनी राऊतांना काढला आहे.

Advertisement

दरम्यान, भाजपाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवसेनेच्या नेत्यांवर करण्यात येत असलेले आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

ही पत्रकार परिषद शिवसेना भवनामध्ये होणार असून भाजपाचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असा दावा राऊत यांनी केला आहे. तेव्हापासून भाजपाचे हे साडेतीन नेते कोण, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेपूर्वी भाजपा नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

 

Advertisement