मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना 31 जुलै रोजी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते. दरम्यान, संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पत्नीच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराची चौकशी करायची असल्यानं गेल्यावेळी ईडीनं राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती.

त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कोठडीत वाढ झाली असून, त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या राऊत मुंबईतील आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) मुक्कामी आहे.

दरम्यान, शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ यांचा कोठडीतील दिनक्रम एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या हाती आला असून, आर्थर रोड कारागृहात ते सध्या काय करत आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना ट्रीटमेंट देण्यात येत असली तरी

देखील आपला बराचसा वेळ संजय राऊत (Sanjay Raut) वाचन, लिखाणामध्ये घालवत आहेत. शिवाय बातम्याही ते पाहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही.

मात्र, इतर काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या सर्वसाधारणपणे नियमानुसार मिळतात. त्यात वही-पेन त्यांना पुरवण्यात आले आहे.

त्या माध्यमातून ते लिखाण करू शकतात. हे लिखाण जेलच्या बाहेर येणार नाही, याची काळजी जेल प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.