मुंबई : गुजरातमधील (Gujrat) गांधीनगरमध्ये (Gandinagar) गिफ्ट सिटीमध्ये (Gift City) आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

या गिफ्ट सिटी केंद्राला अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारकडून (Central Goverment) विशेष भर दिला जात आहे.

हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई (Mumbai) विषयीचे मत व मुंबईवर भाजपकडून कसा अन्याय होत आहे, याबाबत मत मांडले, तसेच केंद्रातील भाजपला (BJP) चांगलेच सुनावले आहे.

Advertisement

मुंबई देशाला २.५ लाख कोटी रुपये देत आहे. तुम्ही तुमच्या पैशांनी इतर राज्यांचा विकास करा. आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका. राष्ट्रहितासाठी आम्ही नेहमीच त्याग केला आहे. त्याविषयी आम्हाला काही म्हणायचे नाही.

पण प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजधानीवर अन्याय का? मुंबई शिवसेनेच्या (Shivsena) ताब्यातून काढून घेण्यासाठी हे सुरु आहे का?

तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून केंद्राला पाहवत नाही असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Advertisement

त्याचबरोबर एखाद्या राज्याचा विकास झाला म्हणून आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे, तरच देशाचा विकास होईल. ते करण्यासाठी मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे?, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.