मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना दोन दिवसांपूर्वी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

दरम्यान, संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीनंतर ईडीच्या (Sanjay Raut Case) कोर्टात हजर करण्यात आलं होत.

Advertisement

सध्या ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरु असून, त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, आता संजय राऊत (Sanjay Raut Letter) यांनी ईडी कोठडीतून आपल्या मित्रपक्षांना एक पत्र लिहिले असून, आपल्याला पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले आहेत.

संजय राऊतांनी (Sanjay Raut Letter) पत्रात लिहिलं आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांना राऊतांनी पत्र लिहिलं आहे. रडायचं नाही लढायचं अशी बाळासाहेब ठाकरेंची नेहमीच शिकवण राहिली आहे.

Advertisement

ही शिकवण घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. माझ्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यावेळेस सगळ्याच मित्रपक्षांनी मला पाठिंबा दिला.

विशेष: काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्वीट करत या कारवाईचा निषेध केला होता. यापुढेही आपल्यावर अशा प्रकारच्या कारवाई होत राहतील आणि आपल्यावर दबाब येत राहील. असे राऊतांनी पत्रात लिहिलं आहे.

Advertisement

तसेच राऊत पुढे म्हणतात, राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर कारवाई केली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मात्र, दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण,

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर या कठीण काळातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर हे पत्र शेअर केले असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement