मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) मित्रपरिवारावर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) घोटाळ्याचा आरोप केला होता.या आरोपाला संजय राऊत यांनी शेणं खायचे स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशा शब्दात प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील (Mumbai) कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर त्यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी माणसाने एकदा शेण खायचे ठरवले तर शेणं खायचे स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या.

Advertisement

ईडीचे (ED) लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात. आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट (Statement) घेत आहेत. मला माहित आहे सर्व. दबाव टाकू, जेलमध्ये टाकू.

अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंड द्या… हे चालू आहे त्यांचे’ असा आरोप केला आहे. दरम्यान ‘संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे.

मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले.

Advertisement

या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे.

या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.’ असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले होते.

Advertisement