मुंबई : परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. हे आरोप शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे.

संजय राऊत म्हणाले, परमबीर सिंग (parambir singh) हे स्वत: आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीपासून अपहरणापर्यंतचे अनेक गुन्हे आहेत. कदाचित मनसुख हिरेन (mansukh hiren case) प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले माहीत नाही.

पण आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतो. आतापर्यंत हे प्रकार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने कितीही आरोप केले आणि त्याचं कितीही भांडवल केलं तरी त्याचा उपयोग नाही, त्यांना आरोप करत राहू द्या, असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला आहे.

Advertisement

सचिन वाझेला सेवेत प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव आणि गृहमंत्र्यांनी माझ्यावर दबाव आणला होता असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. हे सर्व आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, आरोपी स्वत:ला वाचवण्यासाठी कुणाचेही नाव घेत असतो.

आम्हीही अनेकदा पंतप्रधानांचे नाव घेत असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतलं जात होते असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Advertisement