मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, ही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आणि दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे.

आणि याच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिवसेनेकडून (shivsena) सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहेत.

नुकतंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक नवीन निर्धार केला असल्याचं पाहायला मिळत आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार आणायचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्या त्याच हे व्यक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की काय म्हणाले संजय राऊत…

नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेटली आहे. आणि याच भेटीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले…

‘लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वादळांमध्ये शिवसेनेचे पाठिशी ते ठामपणे उभे राहिले.

त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या भेटीतून शिंदे यांना नक्कीच बोध मिळेल. ते एकनिष्ठतेसारख्या गोष्टी त्यांच्याकडून शिकतील.’ असं राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘प्रत्येकाचे एक स्वप्न असते. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे असते. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे.

पण मिळेल त्या मार्गाने नाही, लोकांकडून लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. त्यांना अधिकार काय आहे.

हा पोरखेळ चालला आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात नाहीत. आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपले आस्तित्व दाखवा, असे ते म्हणाले.

तर लावलेच राज्यात सत्तांतर होईल या मताशी ठाम आहे, याचा पुनरुच्चार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.