मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. ‘विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करा’, असे आदेश राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिले आहेत.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून, अनेक नेत्यांनी आपल्या मत मांडण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी देखील या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यावेळी राऊत (sanjay raut) पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत (sanjay raut) .., एकतर सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा कोर्टात पेंडिग आहे.

जोपर्यंत त्याचा फैसला होत नाही, तोपर्यंत राज्यपालांना अशा प्रकारे बहुमत सिद्ध करण्यास सांगता येत नाही, असं सांगतानाच फडणवीसांच्या पत्रानंतर राजभवन कामाला लागले.

त्यांच्या कामाचा वेग पाहता मोदींनी आणलेल्या राफेल विमानापेक्षाही प्रचंड आहे, अशी टीका संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला वेळ अपुरा आहे. तो जेटपेक्षाही फास्ट आहे. मोदींनी जी राफेल विमानं आणलीत, त्यापेक्षाही राजभवनातील कार्याचा प्रचंड वेग आहे. असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानी अर्थात सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मात्र. या बैठकीला शिवसेना (shivsena) नेते अनुपस्थित असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.