मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्षनेत्यांवर संजय राऊत यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची ED कडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच काहींना अटकही करण्यात आली आहे. तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात येत आहे.

यावरच संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत (Mumbai) शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) शेजारील कोठडीत जावं लागेल असे भाजप नेते वारंवार सांगत आहे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावे लागेल.

Advertisement

तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. सरकार पडत नाही म्हटल्यावर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जास्त बोलत नाही. ईडीला कायदेशीरपणे कारवाई करायची आहे तर त्यांनी करावी.

ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचे सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन, तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात.

१२-१२ तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असे माझे आवाहन आहे, असेही संजय यांनी म्हंटले आहे.

Advertisement