मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये (Press conference) भाजपवर जोरदार (BJP) हल्लाबोल केला होता. त्यामळे आता चंद्रकांत पाटील यांनी राऊतांच्या या टीकेला सडेतोड उत्तर देत टोला लगावला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राऊत बोलतात मोहीत कंबोज फडणवीसांना घेऊन डुबणार पण त्याची काळजी तुम्ही करू नका. संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घेऊन डुबणार आहेत.

पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे संजय राऊत शिवसेनेची वाट लावणार आहेत. शिवसेनेला खड्यात घालणार आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Advertisement

तसेच चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संजय राऊतांबरोबर पत्रकार परिषदेमध्ये का नव्हते? असा देखील थेट सवाल शिवसेनेला केला आहे.

दरम्यान, काल शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत भाजपवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मात्र या सर्व आरोपांना कालपासूनच भाजप नेते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

पत्रकार परिषद संपल्यानंतर काहीच वेळात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजप नेत्यांनी पुन्हा पलटवार सुरू केला होता.

Advertisement

काल राऊतांच्या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येने जमले असले तरी शिवसेना आमदार किंवा सरकारमधील नेते का उपस्थित नव्हते असा खोचक सवाल भाजपकडून करण्यात येत आहे.