मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, “मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात पडसात उमटत असून, अनेक जण यानावर आपली प्रतिकिया देत आहेत.

नुकतंच पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलं. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या व्यक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत…

चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याचं वक्तव्य केल्यासंबंधी संजय राऊत याना विचारलं असता ते म्हणाले की,

“भाजपामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तिथे मनमोकळेपणाने मत व्यक्त करता येत नाही. तरीही मी चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांनी थोडा काळ कोल्हापुरचं पाणी दाखवलं.

जे त्यांच्या पोटात मळमळत होतं, ते ओठावर आलं. ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासाही त्यांना करावा लागला. त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता”. असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येत हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे असणार आहे.