शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही चिलखत आहेत. ती काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर नाव सांगणार नाही.

असं आव्हान भाजपला केलं आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 युतीत सडली असा पुनरुच्चार केला होता. त्यानंतर संजय राऊत हे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही भाजपची शस्त्र आहेत. असे सांगत त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाजपला ओपन चॅलेंज दिला आहे. अंगावरती वर्दी असेल तर पोलीस कोणाच्या पण अंगावर जात असतो.

Advertisement

आणि बेकायदेशीर कामे करत असतात. आपण सिनेमात अशा प्रकारचे दृश्य पाहत असतो. तशी ईडी, इन्कम टॅक्स सीबीआय ही त्यांची चिलखत आहेत.

ही चिलखत घालून ते लढतात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी ते चिलखत काढून विना वर्दी मैदानात यावे. नाय मातीत लोळवलं तर आम्ही नाव नाही लावणार.

अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. असे राऊत यावेळेस म्हणाले होते. युतीमध्ये पंचवीस वर्षे सडली हे विधान उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच केलेले नाही.

Advertisement

महाराष्ट्रात भाजपला जमिनीवरून आस्मानापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि हे सर्वांना माहीत आहे. आम्ही युतीचा धर्म पाळला. याचा इतिहास साक्षी आहे.

पण जे झालं ते झालं. उद्धव ठाकरेंनी आपली वेदना व्यक्त केली आहे. आणि ती योग्यच आहे. ही केवळ शिवसेनेची गोष्ट नाही. जेही भाजपसोबत चांगल्या मनाने गेले होते, त्यांचे हेच हाल झाले आहेत.

मग ते अकाली दल असो किंवा गोव्याचे एमजीएम. तसेच इथेही तेच झाले. चंद्रबाबू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे.

Advertisement

शिवसेना एकमेव पक्ष आहे, ज्याने भाजपला किंमत चुकवण्याची भाग पाडले. असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. तसेच आम्ही तुम्हाला घाबरत नाही.

काय करणार आहे तुम्ही? खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचं आयटीफायटी जेल आहे. त्यातून बदनामी कराल. किंवा हरेल पंड्याप्रमाणे गोळी माराल.

दुसर तुम्ही काय करू शकता. तुम्ही शिवसेनेला खतम करू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल. अशा प्रकारचा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

Advertisement