मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये (press conference) ‘आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू’ असे विधान केले आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी सडकून टीका केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये ईडीसह (ED) केंद्र सरकारवर मोठमोठे आरोप केले आहेत. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांची पत्रकार परिषद (Press Conference) म्हणजे सौदेबाजी आहे, अशा शब्दात त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

तसेच राऊतांचे आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या वक्तव्याचा त्यांनी निषेध व्यक्त करत, आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असे कसे चालेल?

Advertisement

सामान्य माणूस कोणताही स्वार्थ न बाळगता मतदान करत असतो. तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सौदेबाजी करता, हे आश्चर्यजनक आहे.

महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे. सुडाच्या राजकारणाचा विषय जाऊ दे हो..जेव्हा भुजबळांना अटक केली, ते सुडाचे राजकारण होते ,आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, याचा काय अर्थ? धमक्या द्यायच्या आणि धमकवायचे, एवढेच सुरु आहे.

यातून शिवसेनेचा जो दबदबा होता, तो संपत आहे, बाळासाहेबांची शिवसेना संपवणारी ही पत्रकार परिषद आहे, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, म्हणणारी शिवसेना आता १०० टक्के राजकारण घुसली आहे. अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.

Advertisement