मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद (Press conference) घेणार आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर बोलत होत्या. यामध्ये त्यांनी सांगितले की आज ३ वाजता संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.

या नियोजित कार्यक्रमाला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) देखील उपस्थित होते. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या चॅनेल आमचे कॉमेंट्स (Comments) चालवतात मग चॅनलने आम्हाला पैसे द्यायला हवेत.

आता आमचे चालेल, आम्ही आता चॅनेलवर राहू मात्र, ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर (Take over) करतील, तुम्ही तुमचे चॅनेल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत असे सुळे यावेळी म्हणाल्या.

Advertisement

त्यामुळे आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसेच पुढे त्या म्हणाल्या की ३ नंतर संजय राऊत यांचा सिक्सर आहे. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसीटी (Publicity) करु असे सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हणाल्या.

आपण वाट बघू संजय राऊत काय बोलतात ते. ते काही तरी महत्त्वाचेच बोलतील असे वाटते, कारण त्यांनी इशारा दिला आहे. सगळा देश त्यांना बघणार आहे. मी पण बघणार असेही सुप्रिया सुळे या कार्यक्रमादरम्यान बोलल्या आहेत.

Advertisement