गुन्हेगारांच्या आनंदात पोलिसांनी सहभागी होणे म्हणजे त्यांना दयामाया दाखविणे, त्यांच्यावर वरदस्त ठेवणे असे होते.

पोलिस निरीक्षकांनी तरी किमान अंतर राखून राहायला हवे; परंतु तसे न होता पोलिस आणि वरिष्ठ अधिका-यांचे गुन्हेगाराशी साटेलोटे व्हायला लागले आहे.

जोगेश्वरीच्या पोलिस निरीक्षकाने तर सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. त्याचा केकही कापला. आता हा वाढदिवस पोलिस निरीक्षकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

Advertisement

महेंद्र नेरलेकर यांनी कापला वाढदिवसाचा केक

ज्यांची गुन्हेगारावर दहशत बसायला हवी, ज्यांना पाहून गुन्हेगारांना कापरे भरायला हवे, तेच गुन्हेगाराशी संगनमत करीत असतील, तर ते कायदा व सुव्यवस्था कशी राखणार, असा प्रश्न निर्माण होतो.

गुन्हेगार आणि पोलिसांच्या मधुर संबंधामुळे नागरिकांत चीड निर्माण झाली आहे. गुन्हेगारासोबत मेजवान्या झोडणे आणि त्यांच्या पैशावर माैजमजा करण्यामुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे.

जोगेश्वरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र नेरलेकर यांनी तर त्यावर कडी केली. गुन्हेगारासोबतचे त्यांचे सख्य त्याचा वाढदिवस साजरा करण्याइतके झाले.

Advertisement

व्हायरल व्हिडिओमुळे पितळ उघडे

नेरलेकर यांनी एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे नेरलेकर यांचे पितळ उघडे पडले आहे.

या व्हिडिओत नेरलेकर एका सराईत गुन्हेगारासोबत केक कापताना दिसत आहेत. संबंधित आरोपीचं नाव दानिश इश्तिखार सय्यद असं आहे.

दानिश हा जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीत वास्तव्यास आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

खुनाच्या प्रयत्नासह हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जामीनावर आहे.

कारवाईची मागणी

काही दिवसांपूर्वी दानिशचा जन्मदिवस होता. त्याने मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोगेश्वरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दानिशच्या घरी दाखल झाले.

त्यांनी दानिशसोबत त्याच्या वाढदिवसाचा केकही कापला. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता नागरिकांनी निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Advertisement