सातारा : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्य बंडातात्या कराडकरांना चांगलेच महागात पडणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. बंडातात्या कराडकरांच्या मठात सातारा पोलीस (Satara Police) दाखल झाले आहेत.

राज्य महिला आयोगाने बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्याची दखल घेत महिलांबाबत अशा प्रकारची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशाराही राज्य महिला अयोहाने दिला आहे.

Advertisement

सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात कारवाई करून त्यासंदर्भातील अहवाल २ दिवसात सादर करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिल्या आहेत.

साताऱ्यातील (Satara) पिंजर (Pinjar) येथे बंडातात्या कराडकर यांचा मठ आहे. त्यांच्या या मठात सातारा पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कराडकरांची चौकशी सुरु आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्रीधोरणाविरोधात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केले होते.

Advertisement

या नंतर महाविकासह आघाडी (Mahavikas Aghadi)सरकारमधील महिला नेत्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. असे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.