पुणे – दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) अधिसभा निवडणुकांचे (voting) पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर (voting) मतमोजणी २९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. 

पुणे, नाशिक आणि अहमदनगर हे तीन जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असून या ठिकाणी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना (Election) मतदानाचा (voting) अधिकार आहे.

यासाठी स्थानिक मतदान (Election) केंद्र रहातात. विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) नोंदणीकृत पदवीधरांमधून विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून दिले जाते. विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाला होता.

दरम्यान, आता निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मतदान (Election) होणार असून, यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह निवडणूक (Election) प्रशासन सज्ज झाले आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार नोंदणीकृत १० उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे.

अधिसभेवर पुढील पाच वर्षांसाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्भिडपणे परंतु जबाबदारीपूर्वक पार पाडा, असे आवाहन कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी बूथ प्रतिनिधी, केंद्र निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांना केले आहे.

मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातील ७४ प्राध्यापक व अधिकारी हे केंद्र निरीक्षक म्हणून तर ११४ जण बूथ प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतील. निवडणुकीची (Election) प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.