पुणे – दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) अधिसभा निवडणुकांचे (voting) पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला मतदान तर (voting) मतमोजणी २९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. तर, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत असल्याचे सांगण्यात आले.

पुणे, नाशिक आणि अहमदनगर हे तीन जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असून या ठिकाणी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदानाचा (voting) अधिकार आहे.

यासाठी स्थानिक मतदान केंद्र रहातात. विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांमधून विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून दिले जाते.

विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाला होता. त्यानंतर अधिसभेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या की आरक्षणाशिवाय याविषयी विद्यापीठामध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

मात्र, आता विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ९८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे विद्यापीठाचे पदवीधर तसेच पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आणि

पुणे विद्यापीठाची (savitribai phule pune university) स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्ती विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यास देण्यात आलेली मुदत गुरुवारी संपली.

त्यामध्ये दिलेल्या मुदतीत खुल्या प्रवर्गातून ४६, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून २४, विमुक्त जाती-भटक्या जमाती (डीटीएनटी) प्रवर्गातून ९, इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) १७, असुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून ४ आणि महिला प्रवर्गातून ८ असे एकूण ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शुक्रवारी (४ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असून शनिवार (५ नोव्हेंबर) हा अर्ज माघारी घेण्यासाठीची मुदत असणार आहे. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडेल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ विकास मंचच्या दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी मंचचे समन्वयक राजेश पांडे, डॉ. राजेंद्र विखे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अपूर्व हिरे उपस्थित होते.

विद्यापीठ विकास मंचच्या वतीने पुण्यातील (savitribai phule pune university) प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, राहुल पाखरे, गणपत नांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे नगरमधून युवराज नरवडे आणि सचिन गोरडे यांना तर, नाशिकमधून विजय सोनवणे आणि सागर वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.