पुणे – दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) अधिसभा निवडणुकांचे (voting) पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक (voting) अखेर पार पडली आहे. दरम्यान, या निवडणुकांचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी (voting) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ. विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी तर,

मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी (voting) विजयी झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला (voting) सुरुवात झाली होती.

विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबद्ध पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, निवणुकींसाठी खुल्या प्रवर्गातून ४६, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून २४, विमुक्त जाती-भटक्या जमाती (डीटीएनटी) प्रवर्गातून ९, इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) १७, असुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून ४ आणि महिला प्रवर्गातून ८ असे एकूण ९८ अर्ज प्राप्त झाले होते.