पुणे – दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) अधिसभा निवडणुकांचे (voting) पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला मतदान तर (voting) मतमोजणी २९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. तर, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत असल्याचे सांगण्यात आले.

पुणे, नाशिक आणि अहमदनगर हे तीन जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असून या ठिकाणी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदानाचा (voting) अधिकार आहे.

यासाठी स्थानिक मतदान केंद्र रहातात. विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांमधून विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून दिले जाते.

विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाला होता. त्यानंतर अधिसभेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घ्यायच्या की आरक्षणाशिवाय याविषयी विद्यापीठामध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात पदवीधर, व्यवस्थापन प्रतिनिधी यासह प्राध्यापक, प्राचार्य गटातील प्रतिनिधींची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे. तर, यामध्ये सहा जागांपैकी एक जागा महिला तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

मतदान केंद्र :
पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड
नगर : सारडा महाविद्यालय
नाशिक : एच.पी.टी. महाविद्यालय

महत्त्वाच्या तारखा :
अर्ज दाखल करणे : १० नोव्हेंबर
अर्ज मागे घेणे : १२ नोव्हेंबर
मतदान : २७ नोव्हेंबर
मतमोजणी आणि निकाल : २९ नोव्हेंबर