Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

एसबीआयने कमावला सर्वात मोठा नफा!

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासाठी मागील जून तिमाही बँकेच्या इतिहासात सर्वात फायदेशीर सिद्ध झाली.

बँकेने यादरम्यान ६,५०४ कोटींचा नफा नोंदवला आहे. वर्षभराआधी समान अवधीत बँकेचा नफा ४,१८९.४ कोटी रु. होता.

या हिशेबाने एसबीआयचा नफा ५५.२४%वाढला. बँकेचा संचालन नफा ५.०६% वाढून १८,९७५ कोटी रु. राहिला. हा गेल्या वित्त वर्षाच्या समान तिमाहीत १८,०६१ कोटी रु. होता. बँकेचे व्याजातून उत्पन्न ३.७ %वाढून २७,६३८ कोटी रु. नोंदले.

Advertisement

हे गेल्या वर्षी समान तिमाहीत २६,६४१ कोटी रु. होते. बँकेच्या ठेवीत ८.८% वार्षिक वाढ नोंदली आहे. बँकेची ठेव ३४.२ लाख कोटींवरून वाढून ३७.२ लाख कोटी रु. झाली.

बँकेने वाटलेल्या कर्जात ५.८% वाढ झाली आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीच्या २३.८५ लाख कोटींच्या तुलनेत वाढून २५.२३ लाख कोटी झाला.

एसबीआयच्या विक्रमी नफ्याचे मुख्य कारण जून तिमाहीत बँक प्रोव्हिजनिंग आणि कॉन्टिन्जन्सी १९.६% घटून १०,०५१.९६ कोटी रुपयांवर आले. किंगफिशरच्या मालमत्ता विक्रीसह बँकेच्या अन्य उत्पन्नात ४८.५% ची वाढ झाली.

Advertisement
Leave a comment