स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मुख्यसभा तसेच वेगवेगळया समित्यांच्या सभा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

हे आदेश दुपारी प्राप्त झाल्याने ऐनवेळी ऑनलाईन सभेची पूर्ण तयारी करता आली नसल्याचे सांगून, सत्ताधारी भाजपने आजची सभा तहकूब केली असल्याचे सांगितले आहे.

अडचणीचे विषय नकोत, म्हणून..

शहरात आंबील ओढ्यातील अतिक्रमण कारवाईचा विषय चर्चिला जात असतानाच या विषयासह, कचरा वेचकांचा प्रश्न घेऊन महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या स्वच्छ संघटनेचा विषय चर्चिला जाऊ नये, यासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची ऐनवेळी ऑनलाईन सभाही तहकूब केली, असा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे.

Advertisement

नगरसेवकांचा संताप

आजची सभा ही मेट्रो आणि पीएमपीच्या विषयावर होणार होती; मात्र आंबील ओढा कारवाई व कचरा वेचकांचे आंदोलन यामुळे ही सभा वादळी ठरली असती.

दरम्यान सभेच्या एक तास आधीच राज्य शासनाने मुख्यसभा घेऊ नयेत असे आदेश दिल्याची माहिती नगरसचिव विभागाकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांना देण्यात आल्या.

त्यानंतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सभेसाठी पालिकेत येऊ नये, क्षेत्रिय कार्यालयातच ऑनलाईन सभा होईल असा निरोप देण्यात आला. त्यामुळे, अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

आम्हाला बोलू दिले जात नाही, तर ऑनलाईन सभेला तरी कशाला बोलविले असा प्रतिप्रश्न उपस्थित करीत काहींनी संतापही व्यक्त केला.