पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ९वी पासून पुढे शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याच्या सूचना शाळा, संस्था चालकांना देण्यात आल्या आहेत.

पुण्यामध्ये लसीकरण वेगाने चालू आहे. तसेच पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत .असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 86 टक्के इतके झालं आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुलनेने कमी लसीकरण झालं आहे. जागतिक रुग्ण पाहता मोठी लाट आहे. परंतु काल आणि परवा दोन दिवसांत पुण्यातील रुग्ण संख्येत घट झाली आहे.

Advertisement

या नियमावलीत 9वी पासून पुढचे सर्व वर्ग पूर्ण वेळेत भरवण्यात येणार आहेत. तर पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जाणार आहेत. 9वी, 10वी आणि 11वीच्या या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुविधा करण्यात येणार आहे. त्या परिसरात रुग्णवाहिका, एक पर्यायी रूम, डॉक्टर, परिचारिकांची टीम असेल.असे पवार यांनी आदेश दिले आहेत.