Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा ३१ जुलैपर्यंत बंद

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या असल्या, तरी पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही जादा असल्याने ३१ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश पालिका आयुक्तांनी काढला आहे.

ऑनलाईन शाळा सुरू राहणार

जा गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आला नाही अशा गावांमधील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. त्यामुळे उद्योगनगरीतील मुलांना अद्यापही ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही.

दीड वर्षांपासून शाळा बंद

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच आहे. अशावेळी मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.

ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.

Advertisement

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेस सुरू

पिंपरी-चिंचवडमधील शाळा सुरू होणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तूर्त ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे; मात्र स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि क्लासेसला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

Advertisement
Leave a comment