file photo

 पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे.

भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक

Advertisement

उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती.

डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. व

णई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून,

Advertisement

आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते.

त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस,

भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.

Advertisement

अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवून

राजेंद्र गावित याठिकाणी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत.

मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे.

Advertisement

पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला.