पुणे – पुणे शहरातील वाघोली परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. सेप्टीक टँक (Septic Tank Death Pune) साफ करताना तिघा कामगारांचा दुर्दैवी अंत असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला सेप्टींक टँकमध्ये (Septic Tank Death Pune) उतरलेल्या दोघा जणांचा मृतदेह हाती लागला होता. तर अन्य एक जण बेपत्ता आहे. पुणे शहरातील वाघोली (Wagholi, Pune) परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून सोसायटीत रेस्क्यू ऑपरेशन केलं जात होतं. अखेर आता तिन्ही कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

सेप्टींग टँकमध्ये गुदरल्यानं कामगारांचा श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलासिया सोसायटी फेज-दोन वाघोली येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर फायर ब्रिगेडला तातडीने पाचारण करण्यात आलं.

फायर ब्रिगेडच्या जवानांनाकडून या कामगारांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोघा कामगारांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान, तिसऱ्या कामगाराचा शोध बराच वेळ सुरु होता. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर तिसरा मृतदेहही फायर ब्रिगेडच्या हाती लागला. नितीन प्रभाकर गोंड (वय-45, बुलढाणा) , सतिशकुमार चौधरी ( वय-35, उत्तर प्रदेश) , गणेश पालेकराव वय-28 (नांदेड) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

गजानन कुरमभट्टी हे ठेकेदार आहेत. सकाळीं टाकी सफाईचे काम चालू असताना टाकीत कामगार पडल्याची माहिती स्थानिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाघोली अग्निशमन केंद्र येथे सकाळी दिली.

अग्निशमन दलाला माहिती मिळतात अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, नितीन माने, संदीप शेळके जवान चेतन खमसे , मयूर गोसावी , तेजस डांगरे , विकास पालवे, अभिजीत दराडे , अक्षय बागल यांनी कामगारांना टाकीतून बाहेर काढले.