‘सीरम’ ने कोरोनावरील मुलांसाठीच्या लसींच्या क्लिनिकल चाचण्या करण्यास परवानगी मागितली होती; परंतु ही परवानगी नाकारण्यात आली असून, आता त्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

दुजाभाव कशासाठी ?

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तावली जात असताना १७ वर्षे वयांपर्यंतच्या मुलांवर ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास ‘सीरम’ला केंद्र सरकारने परवानगी (Permission) का नाकारली? हा दुजाभाव कशासाठी, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

भारत बायोटेक, कॅडीला यांना अहवाल न देताच परवानगी

एकीकडे ‘भारत बायोटेक’ व ‘कॅडीला’ला या दोन्ही कंपन्यांना लस सुरक्षीत असल्याचा अहवाल न घेता त्यांना चाचण्या करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे; मात्र लसीकरणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘सीरम’च्या कोव्हॅक्सला लस सुरक्षित असल्याचा प्रथम अहवाल देण्याची अट घालून चाचण्या घेण्यास परवानगी का देत नाही, असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला.

Advertisement

हा दुजाभाव असून, जर लहान मुलांसाठी लस येण्यास ऊशीर झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

अमेरिकेत चाचणी यशस्वी

‘सीरम’ च्या ‘नोव्हॅक्स’ला अमेरिकेत ही चाचणी करण्यास मान्यता दिली आणि तेथे १७ वर्षांखालील सुमारे ३० हजार मुलांची लस चाचणीही झाली; मात्र भारतात मात्र सीरमला आकस व दुजाभाव सोसावा लागत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.

याच सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरच्या स्वतःची पाठ थापटून घेतली होती. ‘सीरम’ची पूर्वी ११ कोटी डोसची ऑर्डर येत्या आठवडाभरात संपत असून, आज अखेर ‘सीरम’कडे फक्त २४ कोटी कोव्हिशिल्ड डोसेसची ऑर्डरची आहे.

Advertisement