लग्नाचे आमिष दाखवून एका मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने त्याच्या प्रेयसीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आशिष नारायण वानखेडे, असे आरोपीचे नाव आहे.

आशिष याची पीडित तरुणीशी महाविद्यालयात असल्यापासून ओळख होती. नंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले. एकमेकांसोबत ते फिरायला लाँगड्राइव्हला जाऊ लागले.

दरम्यान आशिषने तिला लग्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. आता लग्नच करणार असल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तरुणीने त्याला लग्नाचा तगादा लावल्याने डिसेंबर महिन्यात त्याने लग्न करू असे सांगितले.

Advertisement

मात्र त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तिला तो टाळू लागला. दरम्यानच्या काळात तरुणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. त्यांनी आशिषला घरी बोलावून याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने तिच्याशी फक्त मैत्री असल्याचे सांगितले.

व लग्नास नकार देऊन तिची फसवणूक केली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement