ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘मोफत’ च्या पहिल्या दिवशी सावळा गोंधळ

मुंबईः देशात सर्वंच वयोगटांना मोफत लसीकरण करण्याच्या योजनेत पहिल्याच दिवशी नियोजनात मीठाचा खडा पडला. लस न मिळाल्याने अनेकांना घरचा रस्ता धरावा लागला.

नागरिकांचा उत्साह ओसंडला; परंतु डोस मर्यादित

मुंबईत ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खुल्या झालेल्या मोफत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला.

त्यात दहिसर करोना केंद्रांवर लशींचा कमी साठा असतानाच १८ ते ४४ आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्ती लसीकरणासाठी आल्याने या केंद्रावर प्रचंड गर्दी जमली होती.

मोफत लसीकरण सुरू केल्याने त्यापासून वंचित राहिलेल्या हजारो मुंबईकरांमध्ये उत्साह निर्माण झाला.

त्यात महापालिकेने लशींचा मर्यादित साठा लक्षात घेऊन सुरुवातीच्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाच लस देण्याचे जाहीर केले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनीही लसीकरण केंद्रांकडे गर्दी केल्याचे दृश्य होते.

डोस तिप्पट करूनही गर्दीने नियोजन कोलमडले

दहिसर चेकनाक्याकडील दहिसर कोरोना केंद्राकडे बरीच गर्दी जमली होती. महापालिकेने लसीकरण केंद्रांकडे सध्याच्या शंभर डोसऐवजी तीनशे डोस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

असे असले तरीही लसींची मागणी आणि पुरवठ्यात बरेच अंतर असल्याने लस घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे.

प्रशासन हतबल

ऑनलाइन नोंदणी न करता तीन दिवस थेट केंद्रावर येण्याची सुविधा दिली आहे, तर उर्वरित तीन दिवस ऑनलाइन नोंदणी सक्तीची आहे.

त्यामुळे दहिसरप्रमाणेच अन्य काही केंद्रांवर मुंबईकरांची गर्दी उसळली होती. दहिसर केंद्राकडे लस घेण्यासाठी जमलेल्या सर्वांना लससाठ्याअभावी लस देणे शक्य नव्हते.

त्यामुळे तिथले प्रशासनदेखील हतबल होते. सर्वांची समजूत काढताना अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले

You might also like
2 li