पुणे – ‘पन्नास खोके एकदम ओके..’ ही घोषणा विधानसभेच्या पायर्‍यासह सोशल मिडीयात धुमाकूळ घालत आहे. गेले अनेक दिवस विरोधक (opposition) हे पन्नास खोकेंवरुन सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, 24 ऑगस्टला विधानसभेचं (Vidhansabha) कामकाज सुरु होण्याच्या आधी विरोधकांऐवजी सत्ताधारी आमदारच (Ruling MLA) विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करु लागले.

‘लवासाचे खोके, बारामती एकदम ओक्के, एकदम ओक्के..’ अशा घोषणा शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) आमदारांनी देण्यास सुरुवात केली. ज्यामळे विधानसभेच्या पायऱ्यांवरच मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

आणि तेव्हा पासून ‘पन्नास खोके एकदम ओके..’ ही घोषणा संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या घोषणेवर आपली मते मांडली आहेत.

अश्यातच आता ” काय झाडी ल काय डोंगर…’ या एका डायलॉग मुळे संपूर्ण राज्यात फेमस झालेले शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘इतिहासात क्रांती झाली, तसे झाले आम्ही केले. काहीही बोलतात, गद्दार म्हणतात, खोके काढतात. कुठल्या बापाला माहीत.

आम्हाला डाळिंब भरण्याचे खोके माहिती आहेत फक्त, असे म्हणत ज्यांची संस्कृतीच खोक्यावर अवलंबून आहे, तेच अशी टीका करतात’, असे ते (Shahajibapu Patil) म्हणाले.

शिंदेगटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. 30 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता.