मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, ही उलथापालथ होत असताना आपल्या एका डायलॉग मुळे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस होणारे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मात्र, एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल..’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शहाजीबापू पाटील यांनी सोलापूरच्या उजनी धरणातील पाण्यासाठी एका अधिकाऱ्याला फोन करुन खडसावलं आहे. ‘खोड्या बंद करा. असल्या खोड्या चालणार नाहीत. असली दादागिरी इथं चालणार नाही’,

असं म्हणत शहाजीबापूंनी (Shahajibapu Patil) अधिकाऱ्याला चांगलचं खडसावलं. उजनीचे पाणी सोडण्यासंदर्भात शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला फोन केला होता.

शहाजीबापू पाटील नेमकं काय म्हणाले…

“तुमच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना खोड्या बंद करायला लावा. फॉर्म काढा, पैसे भरा असली दादागिरी करु नका. तुम्हाला पैसेच पाहिजे होते,

तर महिन्याभरापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांच्या दारात का गेले नाहीत, तिथं ऑफिसमध्ये पंख्याखाली बसलेत असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला केला.

कोण आहेत शहाजीबापू पाटील?

शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे सांगोल्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली,

1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव झाला मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला. त्यानंतर 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत सुरत, गुवाहाटी इथेही दाखल झाले होते.

नंतर, आपल्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल..’ या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले.