मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम देखील पार पडला असून, शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, आता या या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतं खातं कोणाला मिळणार या बद्दल सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, अनेक नेते मंडळी यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

अश्यातच आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले की.., “राजकारणात अनेकवेळा नेत्यांवर वेगवेगळे आरोप केले जातात. संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी क्लिन चीट दिल्याची माहिती समोर येत आहे.

एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लिन चीट दिली तर त्याचे राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाबत (Sanjay Rathore) जो निर्णय घेतला तो न्याय देणारा.’ असल्याची प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी दिली आहे.