मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेला असताना त्याने मुस्लिम धर्माप्रमाणे लता दीदींच्या अंतिमदर्शनावेळी फातिहा पढून झाल्यानंतर त्यावर फुंकर मारली होती. त्यामुळे तो प्रचंड ट्रोल (Troll) झाला होता. परंतु आता त्याचा एक जुना व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दिग्गज लोकांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता शाहरुख खान देखील हजर झाला होता.

यावेळी मुस्लिम धर्माप्रमाणे (Muslim religion) त्याने लता दीदींच्या अंतिमदर्शनावेळी फातिहा पडून झाल्यानंतर मास्क खाली घेऊन फुंकर मारली होती.

Advertisement

परंतु यामुळे काही लोकांनी शाहरुख खान पार्थिवावर थुंकला अशी चर्चा सुरू केली होती. त्यामुळे शाहरुख खानला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. अनेकांनी त्या व्हिडिओवर चांगल्या वाईट कंमेंट्स (Comments) केल्या होत्या.

या प्रकरणावर समाजातील दिग्गज नेते मंडळी यांनी शाहरुख खान याने केलेल्या कृतीचे समर्थन करत त्याचे कौतुक केले होते. परंतु आता अभिनेता शाहरुख खानचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये शाहरुख खानने १९९७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ दाखविण्यात येत आहे. शाहरुख खानच्या त्या व्हिडिओमागील सत्य अजून बाहेर आलेले नाही. परंतु नेटकऱ्यांकडून तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Advertisement