Tarak Mehta Ka Ulta Chashma: तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या सिटकॉमपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शो कठीण टप्प्यातून जात आहे. एक म्हणजे तो टीआरपीच्या टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडला आहे, दुसरे म्हणजे अनेक कलाकार एक एक करून शो सोडत आहेत. तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा ह्यांनीही शो सोडले आहे.

सचिन नवीन तारक मेहता असेल:

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, या शोच्या निर्मात्यांना नवीन तारक मेहता मिळाला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफला (Sachin Shroff) तारक मेहताच्या भूमिकेसाठी सामील करण्यात आले आहे आणि तो या शोमध्ये शैलेश लोढा यांची जागा घेणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने शूटिंगही सुरू केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सचिन श्रॉफ हा भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तो अखेरचा बॉबी देओलची वेब सीरिज आश्रम आणि सीरियल ‘गम है किसी के प्यार’ मध्ये दिसला होता.

शैलेश लोढा यांची जागा घेतली (Shailesh Lodha)

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये शैलेश लोढा शोच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसला होता. याच वर्षी मार्चपासून शैलेशने शोचे शूटिंग थांबवले होते. शो सोडण्याबाबत, त्याने एका मुलाखतीत सांगितले की तो त्याच्या करारावर फारसा खूश नाही आणि शोमध्ये त्याच्या तारखा योग्यरित्या वापरल्या जात नाहीत असे त्याला वाटत होते. गेल्या वर्षी त्याने अनेक ऑफर नाकारल्या.

आता तारक मेहता सोडल्यानंतर शैलेश लोढा आणखी एका शो ‘वाह भाई वाह’ (Wah Bhai Wah) मध्ये दिसला. प्रॉडक्शन हाऊसने शैलेशला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण काही निष्पन्न झाले नाही. तारक मेहताचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनीही त्यांच्या जाण्याबद्दल सांगितले होते, ‘या शोमुळे लोकांना लोकप्रियता मिळाली, पण जेव्हा कलाकारांचे पोट भरते तेव्हा ते निघून जातात.’