पुणे – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling) बरखास्त करण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad pawar) असून राज्याच्या दृष्टीने मल्लांसाठी हा मोठा धक्का आहे. भारतीय कुस्ती महासंघाने 30 जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेतला.

दरम्यान, या निर्णयामुळे आता शरद पवार (Sharad pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत जिल्हा संघटना आणि अनेक मल्लांकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

तसेच, राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील. असं सांगण्यात आलं आहे.

देशात हरियाणानंतर कुस्तीमध्ये महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. पण तेथेच संघटना काहीच काम करत नसेल तर कसे चालेल.

तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोपही गंभीर होते. त्यामुळे आम्ही ही कडक कारवाई केली असल्याचे महासंघाच्या सचिवांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती हा शरद पवारांसाठी (Sharad pawar) धक्का आहे. कारण ते या परिषदेचे अध्यक्ष होते. अलीकडेच महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे.

शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. त्यांचा पक्ष सत्तेत प्रमुख भागीदार होता. त्या झटक्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय.

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. “महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अचानकपणे बरखास्त केल्याचे वृत्त कळाले,

तकलादु कारण देऊन जर परिषद बरखास्त केली गेली असेल तर या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो’, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.