बारामती – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होत आहे.

दरम्यान, तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ (Govind Bagh) पुन्हा फुलले आहे.

दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padava) दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे बुधवारी गोविंदबाग (Govind Bagh) येथे नागरिकांना भेटले आणि दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या.

कोविडच्या संकटांमध्ये पाडवा (Diwali Padava) शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुललीच नव्हती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटले.

यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी, छायाचित्र काढण्याची संधीदेखील नागरिकांना मिळाली.

कोणी सुरू केली परंपरा

वेगवेगळ्या कामानिमित्त पवार कुटुंबीय नेहमी घराबाहेरच असतात. त्यामुळे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांनी किमान दिवाळीत तरी पवार कुटुंबीयांनी एकत्र जमावे ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र साजरी करतात.

यावेळी पवार नागरिकांच्याही भेटीगाठी घेतात. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने का होईना शरद पवारांना पाहता यावे, त्यांच्याशी हास्तांदोलन करता यावे, यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गोविंद बागेत येत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आता ही प्रथाच सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच सर्व पवार कुटुंबीयच नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात.