पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील मेट्रोतून (Pune Metro) सफर केली आहे. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा (Pune Metro Work) आढावाही घेतला आहे. त्यांनी मेट्रोतून केलेल्या प्रवासाचा व्हिडीओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

पुण्यातील मेट्रोतून सफर करत असताना शरद पवार यांनी कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना मेट्रो कामावरून काही सूचनाही दिल्या आहे. शरद पवार यांनी अचानक मेट्रोचा प्रवास केला असल्याचे समजत आहे.

Advertisement

शरद पवार यांनी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोला अचानक भेट दिली आणि मेट्रोच्या झालेल्या कामाचा आढावा घेतला आहे. पवार यांचा मेट्रोच्या कामाच्या पाहणी दौरा नियोजित नव्हता तरीही त्यांनी अचानक मेट्रोच्या कामाला भेट दिली आहे.

मेट्रोतून प्रवास करत असताना अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आणि मेट्रोचे आतापर्यंत किती काम झाले आहे. हे देखील विचारले आहे. तसेच राहिलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल असेही विचारले आहे.

कामात कोणता अडथळा आहे का? मेट्रोचे काम करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे? असे प्रश्न देखील शरद पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना विचारले आहेत.

Advertisement

मेट्रोने प्रवास करताना शरद पवार यांनी उभा राहून फुगेवाडी (Fugewadi) ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत (Sant Tukaram Nagar) प्रवास केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी होते. तसेच अधिकारीही उपस्थित होते.