पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (bharat jodo yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे.

मात्र, आता या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तली जात आहे. अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली.

परंतु प्रकृती प्रकृती ठीक नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भारत जोडो यात्रेल उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर शरद पवार (Sharad Pawar) 8 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहेत. 48 तासात राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. भारत जोडो यात्रेत पुण्यातील 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेसाठी कॉंग्रेस नेतेही रोजच्या रोज भल्या पहाटे उठून सराव करत आहे. पण सध्या कॉंग्रेस सोडून महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते या यात्रेमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे.

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रे(bharat jodo yatra)च्या निमित्ताने देशात विरोधी पक्षांची व्रजमूठ दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला प्राप्त झाली आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.