मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर काल रात्री शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्ह्णून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचा सर्व कारभार पाहणार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथ सोहळा झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना या दोन नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच,

शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक पत्रकार परिषद घेत सध्याच्या होत असेल्या राजकीय उलथापालथ वर आपले मत व्यक्त केलं आहे. यावेळी पवार (Sharad Pawar) काय म्हणाले ते पाहुयात….

शरद पवारांच्या (Sharad Pawar) पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :

1. भाजपच्या आदेशामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

2. शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणारही नाही.

3. जनतेमधून बहुमत मिळवलं असतं तर फडणवीसांना शाबासकी दिली असती.

4. सेनेचे 38 आमदार बाहेर नेणे साधी गोष्ट नाही.

5. उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद सोडलं.

6. आमदारांनी शिंदेंवर विश्वास दाखवला यातच त्यांचं यश.

7. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री.

8. फडणवीसांचा चेहरा सांगत होता की, ते आनंदी दिसत नाही.

9. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांचा राजकीय वापराची तक्रार चिंताजनक.

10. महाविकास आघाडी सरकार एकत्रित निवडणुका लढविणार का याचा अद्याप निर्णय नाही.