पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच बारामती (Baramati) मधील गोविंदबाग (Govindbag)येथे संवाद साधला आहे. यामध्ये त्यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय बजेटवर (Union Budget 2022) नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प आहे. अर्थसंकल्प गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा, अधिक हाताला काम देणारा असला पाहिजे.

सर्व सामान्य लोकांची हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल,अशी अपेक्षा होती. नोकरी आणि व्यावसाय संदर्भात अपेक्षा जास्त होत्या. पण अर्थसंकल्प पहिल्या नंतर निराशा आली आहे, अशा शब्दात पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सर्वसामान्य माणसाला आवश्यक दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तुंच्या किंमती नियंत्रणात ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद असणे आवश्यक आहे.

परंतु कालच्या अर्थसंकल्पात याची पूर्तता झालेली दिसत नाही. आपला देश शेती क्षेत्रात लक्ष देणारा आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट केले. साहजिकच शेतकऱ्यांची अधिक गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती.

पण त्याची पूर्तता झाली नाही. निवडणूकीच्या (Election) दृष्टीने अर्थसंकल्पात काही करायचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा काही फायदा होईल असे वाटत नाही. सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेश ची (Uttar Pradesh Election) आहे.

Advertisement

तेथे शेती हा महत्त्वाचा घटक आहे. शेती क्षेत्रातला वर्ग आहे ,तोच नाराज झाला आहे. त्यामुळे परिणाम निवडणूकीवर होईल अस वाटत नाही. असेही शरद पवार म्हणाले आहेत.