मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक (Assembly elections) होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ३ राज्यामध्ये निवडणूक लढवणार आहे. याच निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. आज परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

याचेच औचित्य साधून शरद पवार बोलत होते. भाजप (BJP) एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष आहे.

Advertisement

आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात (Politics) चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात.

पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात असे म्हणत पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही.

Advertisement

पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही (Goa) हे चित्र दिसायला लागले आहे असेही बोलताना शरद पवार म्हणाले.